भारत जोडो यात्रेला 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधींनी कर्नाटकातील तिरुवेकरेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सावरकरांवर टीका केली आहे. याचाच निषेध करत पुण्यात आज भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.